महाराष्ट्र मुंबई

‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र

मुंबई | पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी एचडीआयएलसोबत संजय राऊत यांचा संबंध काय?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल, असंही सोमय्या म्हणाले.

पीएमसी बँकेतील पैसे एचडीआयएलच्या खात्यातून प्रवीण राऊत, त्यांच्याकडून माधुरी राऊत आणि मग तिथून वर्षा संजय राऊत यांच्या खात्यात ट्रांसफर झाले, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

पीएमसी बँग पूनर्जिवीत करण्यासाठी इडीकडून ही कारवाई आहे. हे राजकारण नसून अर्थकारण आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर चिठ्ठी लिहीतात की पीएमसी बँकेत त्यांचे कोटी रुपये पैसे फसले तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या खात्यात हे पैसे जातात. चूक केलीये तर हिशोब तर द्यावाच लागेल, असा इशारा किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना दिला.

थोडक्यात बातम्या-

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे

पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!

“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या अडचणी वाढल्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या