बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्रालय बंद असताना शरद पवारांच्या शागिर्दांनी 15 हजार कोटी लुटले”

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ याच्यांवर घणाघात केला आहे.

कोरोना काळातही ठाकरे सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा सुरूच होता. सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शार्गिद 15 हजार कोटी रुपये लुटत होते, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

याशिवाय सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला आहे. हसन मुश्रीफ यांच्या जावयाला सरकारने दिलेल्या कंत्राटातही घोटाळा करण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठीच मी जात असताना मला अडवण्यात आलं. त्यानंतर ठाकरे सरकारने हे कंत्राट रद्द केलं आहे.

अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 500 कोटींचा घोटाळा झाला असून तो घोटाळाही किरीट सोमय्यांनी उघडकीस आणावा, असा खोचक टोला राऊतांनी सोमय्यांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More