बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर सडकून टीका केली आहे.

हिरेन कुटुंबीयांच्या मनात अजूनही भीतीचं वातावरण आहे. मात्र, एनआयए तपास करत असल्याने त्यांचा या तपासावर विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं. अँटालिया आणि हिरेन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे अधिकारी त्यात गुंतले होते. पुरावा कसा नष्ट करायचा हे त्यांना माहीत होतं. पण या अधिकाऱ्यांना कोण ऑपरेट करत होतं हे माहीत नाही, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. वाझेंवर कारवाई करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे देशमुख यांची शरद पवारांनी हकालपट्टी करावी, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”

‘ही’ थ्री-व्हीलर इलेक्ट्रीक कार 2 रूपयात 5 किमी धावणार!; जाणून घ्या किंमत…

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!

चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने केलं धक्कादायक कृत्य!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More