महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप”

मुंबई | बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंविरोधात हे गंभीर आरोप झाल्यानं विरोधकांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर बंगलो लपवण्याचा आरोप करण्यात आलाय, तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जातोय. ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय, इथली अस्मिता काय, या सगळ्यावर पाणी फिरवण्याचं काम ठाकरे सरकार करीत आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

करुणासोबत सहमतीनं संबंधात; आम्हाला दोन मुलंही आहेत- धनंजय मुंडे

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; मराठा आरक्षणप्रश्नी केली ‘ही’ मागणी

सर्वोच्च न्यायालयाकडून कृषी कायद्यांना स्थगिती, शरद पवार म्हणाले…

“राम मंदिराची निर्मिती करणं हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्वप्न होतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या