महाराष्ट्र मुंबई

“सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले”

मुंबई | राज्य सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले असून त्या पैशातून विदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले आहेत. त्या पैशातून लंडन आणि विदेशात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तसेच इतर कंपन्यांमध्येही हा पैसा डायव्हर्ट करण्यात आला आहे. त्याचा तपास ईडी करत आहे, असं किरीट सोमय्या म्हणालेत.

या पैशाचे लाभार्थी कोण? याचा शोध ईडी घेत आहे. त्या संदर्भातच ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर ठाकरे सरकार एवढी अढीबाजी का करत आहे?, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही?”

‘लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे’; अजित पवारांचं विठूरायाच्या चरणी साकडे 

 चंगू मंगूच्या फालतू गप्पा, फुकट्या लोकांना बघायला इंटरेस्ट नाही; मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर निलेश राणेंची टीका

‘क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा’; प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या