महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर 345 कोटी बिल्डरला गिफ्ट दिले”

मुंबई | उद्धव ठाकरेंनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी 345 कोटी बिल्डरला गिफ्ट दिलेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 28 नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार आहे. यासंबंधी मुंबई हायकोर्टात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन 2 कोटी 55 लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती 900 कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील 354 कोटी आधीच दिले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मी उद्धव ठाकरेंना फक्त पाच प्रश्न विचारले आहेत त्यातील एकाचं तरी उत्तर द्या. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे. शिवसेनेत हिंमत नाही म्हणून विषय वळवत आहेत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?”

‘मत खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा’; नितीश कुमारांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल

…म्हणून ट्विटरकडून काही तासांसाठी अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ब्लॉक

ठाकरे कुटुंबावरील आरोपांनंतर संजय राऊतांची किरीट सोमय्यांना वॉर्निंग, म्हणाले…

मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आलेला- मेधा कुलकर्णी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या