“राज्यातील 50 हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर आहे”
मुंबई | माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. राज्यातील 50 हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे रक्षण करण्याचं काम पूर्ण केल्याशिवाय बाकी काही नाही, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मलिक आणि देशमुख राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात गेले आहेत. त्यांना हायकोर्टात जाऊद्या, ठाकरेंना थप्पडच खायची आहे. एक दुसरी थप्पड दिली ते तुम्ही विसरलात?, अशी टीका सोमय्यांनी केलीये.
शिवसेना नेते संजय राऊतांना कोर्टाने जोरदार कानाखाली वाजवली. शंभर कोटींचा मेधा सोमय्यांचा घोटाळा? शिवडी कोर्टाने आज समन्स काढलं. संजय राऊत हाजिर हो. मेधा किरीट सोमय्यांची याचिका 4 जुलैला दाखल झाली. संजय राऊतांना न्यायालयात यायला लागणार, असं ते म्हणालेत.
उद्धव ठाकरे ज्याने दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी ठेवणार असं सांगितलं. आता पाहा काय होतं ते. आता कळेल त्यांना. अशी माफियागिरी करणाऱ्या सरकारला न्यायालय अशाच पद्धतीने अनेक धडे शिकवणार. शेवटचा धडा हा महाराष्ट्राचे साडेबारा कोटी जनता शिकवणार आहे, अशी टीका सोमय्यांनी केलीये.
थोडक्यात बातम्या-
“शून्य निर्णयक्षमता असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल”
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर, ‘या’ नेत्यांना दिली संधी
“पडद्यामागून कोणीतरी मुंडे, महाजन ही नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतोय”
कोरोनाने टेन्शन वाढलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर
‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळ-वाऱ्यासह जोराचा पाऊस; हवामान खात्याचा मोठा अंदाज
Comments are closed.