मुंबई | ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय?, असा सवाल भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबावर आरोप केले आहेत. ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांचे संबंध काय आहेत?, ठाकरे कुटुंब आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध काय आहेत? असे सवाल सोमय्या यांनी केले आहेत.
मी ठाकरे कुटुंबाला केवळ पाच प्रश्न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनतेला या व्यवहारांची माहिती हवी आहे, असंही सोमय्या यांनी म्हटलंय.
ठाकरे परिवाराने एकूण 40 जमिनींचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 जमिनींचे व्यवहार एकट्या अन्वय नाईकसोबत झाले आहेत. एका व्यक्तीशी जमिनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार कसे काय झाले?, असं सोमय्या यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
‘मत खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा’; नितीश कुमारांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल
…म्हणून ट्विटरकडून काही तासांसाठी अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ब्लॉक
ठाकरे कुटुंबावरील आरोपांनंतर संजय राऊतांची किरीट सोमय्यांना वॉर्निंग, म्हणाले…
मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आलेला- मेधा कुलकर्णी
उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक; अशोक चव्हाणांकडून जाहीर कौतुक
Comments are closed.