बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल देशमुखांना फरार घोषित करून त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा”

रत्नागिरी | ईडीच्या कचाट्यात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी हे वरळीमधील सुखदा इमारतीमध्ये आले होते. त्यानंतर आता त्यांची सीबीआय चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.

अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. त्यासोबतच ते साक्षीदार फोडण्याचंही काम करत आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांच्या वकिलांना दिली आहे, असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

देशमुखांना बाहेर ठेवणं धोक्याचं आहे त्यामुळे त्यांना फरार घोषित करून त्यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे. सोमय्या यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल देशमुखांवर आरोप करत त्यांना फरार घोषित करण्याची मागणी केली.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या कंपनीतील घोटाळ्यामधील पैसा हा देशमुखांच्या मुलाच्या कंपनीत आला आहे. मुलाची चौकशी करून त्याच्यावरही कारवाई करावी, अशीही मागणी सोमय्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्याशी लग्न का करत नाहीस?’; शहनाज सिद्धार्थचा ‘तो’ रोमँटिक व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

मुकेश अंबानींचा मोठा प्लॅन तयार, पहिल्यांदाच केला शेअर

‘देशात 8.5 टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे’; राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर टीका

कोरोना आणि गणेशोत्सवाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले

बेळगावच्या जनतेला संजय राऊतांनी केलं ‘हे’ आवाहन, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More