बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासुन भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता किरीट सोमय्यांनी थेट मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील  यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांनी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी आरोप केले आहेत.

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया आहेत,असं धक्कादायक वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटलांनी मला गैरकायदेशीरपणे घरात कोंडून ठेवलं.  तसेच सीएसटी स्टेशनच्या बाहेर देखील कोंडले, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्यांनी माझ्याकडे विश्वास नांगरे पाटलांविरोधात पुरावे आहेत , असं देखील म्हटलं आहे. ज्यावेळेस नांगरे पाटील मला घरात कोंडून सुचना देत होते तेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि मिहीर कोटेचा तेथे उपस्थित होते. मला नजरकैदेत ठेवण्याची आदेश नव्हता तर नांगरे पाटलांनी मुलुंड पोलिसांवर कारवाई का केली नाही?, असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांना गृहमंत्री आश्वासन देत होते तर त्यांनी तसं सांगावं, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी मी ईडीकडे का तक्रार केलीय?, हे सांगितल आहे. राज्यात भ्रष्टाचाऱ्यांना पकडण्याचं काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच आहे. मात्र, हे अधिकारीच राज्यसरकारने भ्रष्ट केले आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. राज्य सरकार आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करत नाही. त्यामुळे मला केंद्रीय तपास यंत्रणांकडे जावं लागत असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

जॉब अलर्ट! अमेरिकेची ‘ही’ कंपनी पुढील वर्षी करणार 10 हजार पदांची भरती

मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जास्तच पाऊस पडतोय- जयंत पाटील

देवेंद्र फडणवीसांच्या मराठवाडा दौऱ्याआधी पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडली!

”काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं होईल”

‘…तर ड्रोन हल्ले करण्याचा अधिकार अमेरिकेकडे आहे’; अमेरिकेचा पाकिस्तानला धमकीवजा इशारा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More