किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर
मुंबई | महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना त्यांना नेहमी धारेवर धरुन त्यांच्या विरुद्ध सतत आंदोलने आणि मोर्चेबांधणी करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आता माजी मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांच्या विरुद्ध वादग्रस्त ट्विट केले आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ट्विट केले.
“मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्रीना हाटविल्या बदल अभिनंदन केले”, असे ट्विट सोमय्या यांनी केले. मात्र, आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सोमय्यांच्या ट्विटमधील माफिया या शब्दावर आक्षेप घेतला जात आहे. सोमय्या यांनी मात्र हा आक्षेप फेटाळत आपण ट्विट केलेल्या माफिया या शब्दावर ठाम असल्याचे म्हंटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्याबद्दल आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले आहे ते सोमय्यांशी या विषयावर बोलतील, असं केसरकर म्हणाले.
जेव्हा आम्ही मुंबईत आलो तेव्हा आमची आणि भाजपच्या आमदार आणि नेत्यांची बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विषयी काही बोलायचे नाही, असा ठराव सर्वानुमते पास झाला होता. ज्येष्ठ नेत्यांबद्दल कोणीही वक्तव्ये काढू नये असे ठरले होते, तरी देखील सोमय्या यांच्या ट्विटमुळे हा वाद निर्माण झाला. सोमय्या हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्या या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलतील, असं देखील केसरकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
शहाजीबापू पाटलांवर मोठं संकट, थोडक्यात बचावले; वाचा सविस्तर
काय ते झाडी, काय ते डोंगर; पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्यातील ‘या’ जागा एकदम ओक्के
‘मी एक दिवस कपडेच घालणार नाही म्हणजे…’, उर्फी जावेदच्या बोल्ड वक्तव्याने खळबळ
कोरोनाच्या ‘या’ दिर्घकाळ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
Comments are closed.