बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

नवी दिल्ली | आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे किरीट सोमय्या यांनी आता एक नवीन घोषणा केली आहे. त्यांनी याआधी अनेकवेळा पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारमधील नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप केले होते. आता त्यांनी ट्विट करून एक घोषणा केली आहे.

किरीट सोमय्या यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आज संध्याकाळी 4:30 वाजता महाराष्ट्र सरकारच्या घोटाळ्यांचे दहन करणार असल्याची घोषणा ट्विटमधून केली आहे. सोमय्या यांनी यासाठी त्यांच्या मुलूंड येथील निवासस्थानी राक्षसाचा एक पुतळा उभारला आहे. या पुतळ्याला ‘वसूली सरकार घोटाळे’ असं नाव दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी टविटमध्ये म्हटलं आहे, उद्या दसरा, 15 ऑक्टोबर दुपारी 4:30 वाजता महाराष्ट्राचा घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळाचे दहन निलम नगर, निवास, मुलूंड आपण यावे, विंनती, असं ट्विट सोमय्या यांनी केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी रावणाची प्रतिमा शेअर करत त्याला वसूली सरकार नाव दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये शेअर केलेल्या या पुतळ्यावर त्यांनी राज्य सरकारवरील नेत्यांमध्ये केलेल्या घोटाळ्यांची नावे दिलेली आहेत. या पुतळ्याचे दहन करून ते दसऱ्याच्या मुहूर्तावर आघाडी सरकारचा निषेध करणार असल्याचं किरीट समोय्या यांनी सांगितलं आहे.

 

 

थो़डक्यात बातम्या-

“बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत”

“गोव्यात जिंकणारा पक्ष लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”

‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेनं सेनेला डिवचलं

पालिका निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर!

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More