बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#Video | देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो! ताजोद्दीन महाराजांनी चालू कीर्तनात देह ठेवला

धुळे | राष्ट्रीय मुस्लिम कीर्तनकार तथा वारकरी संप्रादायाचे प्रचारक आणि प्रसारक ह.भ.प. ताजोद्दीन शेख महाराज यांचे सोमवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान निधन झाले. साक्रीतील जामदे परिसरात ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन साप्ताह दरम्यान कीर्तन करताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर शेख महाराजांना शमिमंडळ आणि नंदूरबार येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर शेख महाराजांचं पार्थिव औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. शेख महाराजांच्या निधनामुळे वारकरी बांधवांवर शोककळा पसरली आहे.

हिंदू-मुस्लिम बांधवांमधील दरी मिटवण्यासाठी शेख महाराजांनी हजारो कीर्तने केलीत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कीर्तन सम्राट म्हणुन ओळखलं जायच. शेख महाराजांनी महाराष्ट्रासह, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आणि इतर ठिकाणी हिंदू धर्माचे राष्ट्रीय प्रचारक म्हणून कीर्तने प्रवचने दिलीत. त्यांनी आयुष्यभर हिंदू धर्माचं पालन केलं. त्यांचा जन्म औरंगाबादजवळील सातारा या ठिकाणी झाला. त्यांना लहानपणापासून कीर्तनाची आवड होती. शेख महाराजांनाच्या कीर्तनामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला होता. परंतु तरीही शेख महाराजांनी कीर्तन सोडलं नाही.

शेख महाराज उत्तम गायनाचार्य होते. त्याचबरोबर त्यांचे संस्कृत भाषेवरही प्रभुत्व होते. शेख महाराजांनी मराठी वाड:मय आणि संत साहित्यावर पी.एच.डी केली आहे. त्यामुळे त्यांनी काही काळ प्राध्यापकाची नोकरी सुद्धा केली होती.

दरम्यान, शेख महाराजांचं कीर्तन लाईव्ह ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. त्याचबरोबर त्यांचे युट्युबवरही अनेक व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. त्याठिकाणीही त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठवाड्यात पावसाचं थैमान! 35 जणांचा मृत्यू तर 20 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

‘माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही’; जयंत पाटील भावूक

देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो! ताजोद्दीन महाराजांची चालू कीर्तनात घेतला अखेरचा श्वास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More