बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

83च्या ‘त्या’ मिस्ट्री बाॅलची कहाणी 38 वर्षांनंतरही उलघडली नाही; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | भारतात क्रिकेटची मोठी क्रेझ असते. क्रिकेट विश्वचषकाची (Cricket World Cup) भरपूर विजेतेपदं पटकावली नसली तरी काही कायम आठवणीत राहणाऱ्या घटनांमुळं भारतीय क्रिकेटला जगभरात नवीन ओळख मिळाली आहे. 1983ला विश्वचषकातील विजय (1983 World Cup Winning) भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.याच ऐतिहासिक विजयावर 83 हा चित्रपट येत आहे.

आपल्या अप्रतिम खेळाच्या आणि नेतृत्व गुणांच्या जोरावर भारताचा महान कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारताला पहिल्यांदा जगजेता बनवलं होतं. याच विश्वचषकात भारत-इंग्लंडमध्ये 22 जून 1983 ला सामना चालू होता. भारताचा महान गोलंदाज किर्ती आझाद (Kirti Azhad) गोलंदाजी करत होते. तर इंग्लंडचा इयाॅन बाॅथम फलंदाजी करत होता. पण याच दरम्यान आझाद यांच्या एका बाॅलनं इतिहास घडवला.

आझाद यांनी बाॅल टाकला. या बाॅलनं बाॅथमला काही कळायच्या आत बाॅथमचा त्रिफळा उडावला. सर्वांना या बाॅलनं आश्चर्याचा धक्का दिला होता. कारण हा बाॅल विकेट घेईल असं कोणाला वाटलं नव्हतं. बाॅल काही प्रमाणात खाली राहिला होता व काही प्रमाणात स्पिन देखील झाला होता. यावर कपिल देव यांनी प्रश्न केला की एकाचवेळी बाॅल खाली पण राहातो आणि स्पिन होतो, हे अचंबित करणारं आहे. त्यावर किर्ती आझाद यांनी यामागील कारण अद्याप समजलं नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, भारताच्या ऐतिहासिक विजयावर 83 हा चित्रपट येत आहे. त्यात हा व्हिडीओ असून हा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. किर्ती आझाद यांच्यावर या विकेटनंतर लोकांनी मैदानात येऊन नोटा उधळल्या होत्या त्या नोटा आझाद यांनी अजून सांभाळून ठेवल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

थोडक्यात बातम्या 

तळीरामांसाठी खुशखबर! ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“अजित पवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा”

“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघंही घमेंडी”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, त्यांची छटाकभर लायकी मात्र…”

रुपाली पाटील ठोंबरेंचं ठरलं, राष्ट्रवादीतच जाणार?; हे आहेत स्पष्ट संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More