“मातोश्रीत बसून सत्ताफळं खाणाऱ्यांनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात”
मुंबई | रविवारी राज्यभर मोठ्या उत्साहासात रामनवमी साजरी करण्यात आली. रावनवमीच्या मुहुर्तावर मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी भोंगे लावलेली टॅक्सी शिवसेना भवनासमोर नेली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या टॅक्सीत हनुमान चालिसा लावली.
या घटनेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेवर टीका केली होती. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. मला स्टंटबाजीला भाव द्यायचा नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मनसेला टोला लगावला होता. यानंतर मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
शिवसेना संपली अशी ओरड काँग्रेसने अनेकदा केली पण बाळासाहेबांनी शिवसेनेला अखेर उभं केलंच. त्यांच्याच परिश्रमाची सत्ताफळं आज मातोश्रीत बसून आदित्य ठाकरे खात आहेत, असा घणाघात किर्तीकुमार शिंदे यांनी ट्विट करत केला आहे. राहिला प्रश्न मनसेचा तर मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात. कोण संपलंय हे त्यांना कळेल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
दरम्यान, किर्तीकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आदित्य ठाकरे यांचा एक जूना फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोसोबत ‘मोठ्यांमध्ये छोटा आला की होणारी गोची. बोलू की नको बोलू’, असं कॅप्शन देत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“शिवसेना संपली” अशी ओरड काँग्रेसने अनेकदा केली, पण बाळासाहेबांनी शिवसेनेला अखेर उभं केलंच. त्यांच्याच परिश्रमाची सत्ताफळं आज मातोश्रीत बसून @AUThackeray खात आहेत. राहिला प्रश्न मनसेचा; मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात. कोण संपलंय, हे त्यांना कळेल. pic.twitter.com/qbkF3xcTtg
— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) April 10, 2022
मोठ्यांमध्ये छोटा आला की होणारी गोची-
“बोलू… की, नको बोलू?” pic.twitter.com/jBdFZBu8rj— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) April 10, 2022
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार
‘गोरं मूल जन्माला यावं म्हणून सानियाने…’, शोएब मलिकचा खुलासा
सिनेसृष्टी हादरली, मुलाच्या मृत्यूच्या 2 महिन्यातच ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे…”
LIC ची भन्नाट योजना! फक्त 73 रूपये गुंतवून मिळू शकतात 10 लाख रूपये
Comments are closed.