अन्नदात्याचा पाहुणचार करण्यासाठी धावले शीख-मुस्लीम बांधव

मुंबई | आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईमध्ये धडकलाय. जगाच्या पोशिंद्याचा पाहुणचार करण्यासाठी यावेळी शीख तसेच मुस्लीम बांधव धावल्याचं चित्र मुंबईमध्ये पहायला मिळालं.

काल भर उन्हात मुंबईच्या रस्त्यावर शेतकरी बांधव आपला रस्ता कापत होता, अशावेळी मुस्लीम तसेच शीख बांधवांनी पाण्यापासून ते जेवणापर्यंतची सोय करण्याचं काम केलं. एवढंच नव्हे तर मध्यरात्री जेव्हा लाँग मार्च सोमय्या मैदानावरुन आझाद मैदानाच्या दिशेनं निघाला तेव्हाही मुस्लीम बांधवांनी रस्त्याच्या कडेला पाणी, खजूर तसेच बिस्कीट वाटप केलं. 

संत बाबा ठाकर सिंह कारसेवा, जगदंब प्रतिष्ठान, बॉम्बे कॅथॉलिक सभा या संस्थांचा यामध्ये सहभाग होता. तसेच आणखीही काही संस्था आहेत ज्यांची नावं कळू शकली नाहीत.