Top News पुणे महाराष्ट्र

अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन

पुणे | किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहनानुसार 19 मार्च रोजी साऱ्या महाराष्ट्रात देशातील काही राज्यात, जगातील काही देशात अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे एक दिवसाचा उपवास करण्यात आला. 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा हा ३४वा स्मृती दिन होता.

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी सांगितले की, यंदा करोनाचे निमित्त करून सरकारने सामुदायिक उपोषणाला परवानगी दिली नाही. अनेक ठिकाणी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली, तरीही लोकांनी वैयक्तिक उपवास करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदाच्या उपवासात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

ते पुढे म्हणाले की, ‘आजही दररोज 40 ते 50 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. करोना पेक्षा भीषण परिस्थिती आहे. मात्र मारणारे शेतकरी असल्यामुळे सरकार आणि इंडियन समाज त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अमर हबीब यांनी २०१७ साली पहिल्यांदा उपवास केला. नंतर हा उपवास दरवर्षी होऊ लागला आहे. सातत्याने अन्नत्याग करणार्याची संख्या वाढत आहे. समाजात जागृती व्हावी, सरकारवर प्रभाव पडावा व व्यक्तीगत स्तरावर शेतकर्याप्रति आपली बांधीलकी बळकट व्हावी असे या अन्नत्याग आंदोलनाचे हेतू होते. त्यात आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे’.

अमर हबीब पुण्यात किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते अमर हबीब यांनी आज सकाळी फुलेवाड्यात जाऊन फुले दाम्पत्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व नंतर बालगंधर्व येथे येऊन त्यांनी दिवसभर उपवास केला. त्यांच्या सोबत किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक मयूर बागुल, नितीन राठोड, ऍड महेश गजेंद्रगडकर, अनंत देशपांडे, राजीव बसरगेकर, असलम सय्यद, संतोष मांढरे, सचिन गुरव, सलीम शेख, अमित सिंग आदी होते. सरकारने सामूहिक उपोषणाला बंदी केल्यामुळे अमर हबीब यांना व्यक्तिगत उपवास करावा लागला.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर आहे- नरेंद्र मोदी

कोरोनावर एकच मंत्र काम करेल, ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या