‘मी तर स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो’, शिंदे गटातील आमदाराचं मुख्यमंत्र्यांसमोरच मोठं वक्तव्य
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईत त्यांच्या गटातील बंडखोर आमदार किशोर अप्पा पाटील (Kishor Appa Patil) यांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या समारंभात भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला अजून खरे वाटत नाही, की मी मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री झालो यावर माझा विश्वास बसत नाही.
तर किशोर अप्पा पाटलांनी त्यांच्या भाषणाअगोदर भाषण केले होते. ते त्यांच्या भाषणात म्हणाले, मी स्वत:ला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री (Chief Minister) समजतो. जवळचा माणूस म्हणून मला मंत्रीपद देणार असाल तर ते मला अजिबात पटणार नाही. पण कर्तृत्वावर मंत्रीपद देणार असाल तर त्याचे स्वागत आहे, असे यावेळी किशोर पाटील म्हणाले.
राज्यमंत्र्यांचे गेल्या अडीच वर्षात फार हाल झाले. त्याचवेळी ते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, सत्तार साहेब तलाठी अधिकाऱ्याची बदलीही करु शकले नाहीत. अरे मंत्रीपद का घ्यायचे, मी स्वत:ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो, असे देखील यावेळी किशोर पाटील म्हणाले.
दरम्यान, राज्यात नवे वातावरण दिसत असून लोक कानाकोपऱ्यातून येत आहेत. मुंबईत देखील कोणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. मी मुख्यमंत्री झालोय यावर माझा विश्वासच बसत नाही. आणि मी एकटा नाही तर माझ्यासोबत हे सगळे आमदार मुख्यमंत्री झाले आहेत. एक एक कार्यकर्ता स्वत:ला मुख्यमंत्री समजू लागला आहे, असं एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणात म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनने झाप झापलं, म्हणाली…
‘शरद पवार म्हणाले आणि आम्ही विरोधी बाकांवर बसलो’, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ आठवण
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सज्ज
देशात कोरोनाची चौथी लाट आली?, धडकी भरवणारी आकडेवारी समोर
Comments are closed.