चंद्रापुरात शिवसेेनेला मोठा धक्का; उपजिल्हाप्रमुखाने उद्धव ठाकरेंना पाठवला राजीनामा

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांनी राजीनामा दिला आहे.

पक्षात मान मिळत नसल्यामुळे किशोर जोरगेवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला. विधानसभा निवडणुकीवेळी दुसरा क्रमांक मिळवत त्यांनी 50 हजार मतं घेतली होती. त्यात त्यांनी भाजपला चांगलीच टक्कर दिली होती.    

दरम्यान, अनेक दिवसांपासून जोरगेवार यांच्या काँग्रेस प्रवासाची चर्चा रंगली होती. त्याबद्दल काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हार्दिक पटेलच्या उपोषणाचा नववा दिवस, तयार केलं मृत्यूपत्र!

-नक्षलवाद्यांनी भाजप सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे विधान मूर्खपणाचे- शिवसेना

-शिस्तीचा आग्रह धरणाऱ्यांवर आज हुकूमशाहीचा आरोप केला जातोय- मोदी

-झाडावरचे नारळ काढून इशांत लंबू झाला- सचिन तेंडुलकर

-मराठा तरुण अस्वस्थ; आणखी एकानं विहिरीत उडी मारुन जीव संपवला!