नागपूर | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना आवरा, असं पत्राद्वारे मर्यादेचा सल्ला देणारे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी पुन्हा एकदा ब्लॉगच्या माध्यामातून फडणवीस आणि त्यांच्या पत्नीवर बोचरी टीका केली आहे. त्यासोबत त्यांनी भाजपसह संघावरही निशाणा साधला.
पोटभरू मंडळी फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर मला एकेरी भाषेत शिव्या देतात. माझ्या पत्नी आणि मुलींना टॅग करतात. अमृतांनी महिला स्वातंत्र्य जरा जास्तच वापरलं. त्यामुळे देवेंद्रजींच्या अडचणी वाढत आहेत. मला पोटभरु भ्रष्ट थुंकीचाटू नेत्यांकडून शिव्या देण्याचा प्रकार आवरा, अशी बुद्धी देवाने द्यावी यासाठी हा प्रपंच केला, असं तिवारींनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
संघाने योग्यवेळी पुढाकार न घेतल्यामुळे शिवसेनासारखा हिंदू मनाचे आणि जनहीत जोपासणारा पक्ष दूर लोटला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला सेनेच्या स्टाईलने उत्तर द्यायचं नाही असं सांगितलं. त्यामुळे कोणीही आंदोलन केलं नाही, असं म्हणत तिवारींनी संघ आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, तिवारींनी लिहिलेल्या या पत्रामुळे आता सेना-भाजपमध्ये मोठा वादंग होण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे जखम टोंगळ्याला अन् पट्टी मस्तकाला; बच्चू कडूंचा घरचा आहेर
बळीराजाला सुखावणारी बातमी; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भगवा घेतलेल्या सचिन अहिरांवर सेनेने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!
…तर MPSC च्या अध्यक्षाची गाढवावरुन धिंड काढू- गोपीचंद पडळकर
Comments are closed.