मुंबई | देशात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. झायडस कॅडिला लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली. त्यामुळे देशात केव्हाही लसीकरणाला सुरूवात होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लस टोचणं हे सुद्धा एक स्किल आहे. मी हे स्किल विसरलेले नाही. त्यामुळे परवानगी मिळाली तर मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल. लसीकरणाच्या मोहिमेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत काम करायला आवडेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
कांजूरमार्ग येथील इमारतीत कोरोना लसीची साठवणूक केली जाणार असून लसीवर सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती पेडणेकरांनी दिली.
दरम्यान, किशोरी पेडणेकर या आधी पारिचारिका होत्या. लॉकडाऊनच्या काळातसुद्धा त्यांनी परिचारिकेचा ड्रेस परिधान करून रुग्ण सेवा केली होती.
थोडक्यात बातम्या-
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास आरपीआयचा विरोध- रामदास आठवले
“जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण!”
‘…तर काँग्रेसला खूश केलं असतं’; कंगणा राणावतची उर्मिला मातोंडकरांवर बोचरी टीका
भिवंडीतील शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांकडून गोळीबार!
‘वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा’; नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्