बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालिकेचं कौतुक केलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीसांना टोला हाणला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही. पण त्यांनी सार्वजनिकरित्या भाष्य केलं असेल तर त्यावर बोलावं लागेल. फडणवीसांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी मुंबईला काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीने असं काही बोलणं हे महाराष्ट्राला आणि मुंबईला पटण्यासारखं नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांनी फ्रस्टेशनमध्ये काहीही बोलू नये, तसं होऊही नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

आमचं काम जागतिक स्तरावर पोहोचलं आहे. ते विरोधकांच्या जिव्हारी लागलं आहे. विरोधक म्हटल्यावर ते टीका करणारच. त्यांच्याकडून शाबसकीची अपेक्षा नाही. जगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला शाबासकी दिली आहे. म्हणून विरोधक काय म्हणतात त्यावर रिअॅक्ट होण्यापेक्षा आम्ही आणखी काय चांगलं करू शकतो, यावर आमचा भर असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. लसींसाठीचं ग्लोबल टेंडर ही महापालिकेची नौटंकी असल्याचा आरोप विरोधी पक्षने केला होता. यावरही पेडणेकरांनी भाष्य केलं.

दरम्यान, विरोधकांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. नौटंकी वगैरे शब्द विरोधकांनाच लागू होतात. आम्ही चांगलं काम केलं तर त्यांना मिरची लागत, अशी टीकाही पेडणेकरांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आवरलं नाही रडू, पाहा व्हिडीओ

पाच दिवसाच्या बाळासह ओढ्यात अडकली होती ओली बाळंतीन, माऊलींनी वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

‘लाॅकडाऊन करूनही फारसा फायदा झाला नाही’; हसन मुश्रीफांचं धक्कादायक वक्तव्य

सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही- प्रविण दरेकर

उपराष्ट्रपती नायडुच नाही तर RSS नेत्यांचीही ब्लू टिक ट्विटरनं हटवली!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More