Top News

कोरोना रात्रीचा फिरतो का?, म्हणणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर; म्हणाल्या..

मुंबई | कोरोनाचं दुसरा प्रकार ब्रिटनमध्ये आला आहे. या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल जात असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 5 जानेवारीपर्यंत राज्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला. यावर कोरोना रात्रीचा फिरतो का असं म्हणत विरोधक या निर्णयाला विरोध करत आहेत. विरोधकांना मुंबईच्या महापौरांनी हा निर्णय का घेण्यात आला याचं उत्तर दिलं आहे.

कोरोना रात्रीचा फिरतो का? अस म्हणणाऱ्यांना कळलं पाहिजे की नवीन वर्ष स्वागत करताना रात्री गर्दी होते. म्हणून हे निर्बंध आहेत. राजकारणी लोकांना जर मुंबईकरांच्या जीवावर उठायचं असेल तर याला कायदा आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईकर गाईडलाईन पाळत आलेले आहेत. ज्यांना यात राजकारण करायचं आहे. त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करतील, असा टोलाही पेडणेकरांनी लगावला.

दरम्यान, मुंबईकरांनो कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या. मार्चपासून सर्व सण घरीच साजरे करण्यात आले आहेत. नवीन वर्षात घरीच बसून जल्लोष करा, असं आवाहनही पेडणकरांनी मुंबईकरांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!

वयाच्या अवघ्या 17 वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटपटूने केला भाजपमध्ये प्रवेश

आई-बापाची भांडणं; आता पोरानं आईविरोधात ठोकला शड्डू!

सिद्धिविनायकाच्या दर्शनावेळी कंगणासोबत दर्शन घेणाऱ्या राज ठाकरेंच्या मसल मॅनने कंगणासोबतच्या नात्याचा केला उलगडा

दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री केजरीवालांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या