बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका”

मुंबई | मंदिरे उघडी करण्याबाबतची मागणी विरोधी पक्षांनी राज्य सरकारकडे लावून धरली आहे. जर मंदिरे उघडली नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा मनसेने ठाकरे सरकारला दिला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेवर खोचक अशी टीका केली आहे.

राजकीय पोळ्या भाजून घेणारे हे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. यावेळी बोलताना पेडणेकरांनी मार्शलवरही निशाणा साधला.

दरम्यान, मास्क न घालता फिरणारे अनेक लोक हुज्जत घालत असतात. अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या मार्शल विरोधात तक्रारी आल्यास अशा क्लिनअप मार्शलवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, दोन वर्षाच्या कराराची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

‘…अन्यथा कडक निर्बंध लावावे लागतील’; एकनाथ शिंदेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मांस, दारू विक्रीबाबत मथुरेमध्ये आदित्यनाथांनी घेतला मोठा निर्णय!

येत्या निवडणुकांबाबत हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

मराठवाड्यात पावसाने पोलीस स्टेशनला बनवलं तलाव, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More