महाराष्ट्र मुंबई

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

मुंबई | मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्या  ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.

लोकल ट्रेन सुरु झाल्यास कोरोना सर्वदूर पसरण्याचा धोका आहे. ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे रेल्वे सुरु होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही- नितीन राऊत

…तर ठाकरे सरकार काय फक्त गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या