“सत्ता गेल्यापासून भाजपच्या बुडाला आग लागलीये”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु आहे. महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचं चित्र आहे. अशातच आता नवाब मलिक यांच्यानंतर आता शिवसेना नेते यशवंत जाधव यंत्रणेच्या रडारवर सापडले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच गोंधळ उडाला आहे.
आज सकाळी आयकर विभागानं मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. याप्रकरणी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज तुम्ही ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहात ते मुंबई आणि महाराष्ट्र बघत आहे. जिथे भाजापाची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणि सत्ता गेल्यापासून बुडाला आग लागली आहे हे महाराष्ट्र आणि मुंबई बघत आहे, असं पेडणेकर यांनी म्हटलं.
आम्ही कायदा मानतो आणि त्यानुसार ही पाहणी आहे. यशवंत जाधव याला उत्तर देतील. त्यामुळे उगाचच वातावरण बिघडू नका. त्यामुळे शिवसैनिकांनी कुठलाही अनुचित प्रकार करु नका, असंही पेडणेकर म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या –
“तुमचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का?, रोज गंगेत स्नान करुन पाप करतात”
युक्रेनमधील सायकलस्वारावर पडला रशियाचा बॉम्ब, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर
मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई
‘ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी खुशाल जा पण नंतर…’, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी
Russia-Ukraine War | युक्रेनियन सैनिकाचा ‘तो’ भावूक व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
Comments are closed.