“स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून एवढा द्वेष करणं दुर्दैवी”
मुंबई | मशिदींवरील भोग्यांविरोधात मनसे (MNS) आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. मनसेकडून आज पहाटेपासूनच ठिकठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. मनसेने सकाळपासूनच आंदोलन सुरू केलं असून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर यांनी या आंदोलनाबद्दल बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष करणं हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्यांना भोंगे उतरवायचे असतील तर केंद्राला सांगा. संपूर्ण देशभरात निर्णय व्हायला हवा. केवळ मतांच्या राजकारणासाठी यांना महाराष्ट्र आणि मुबंई दिसतंय का?, असा सवाल देखील किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना हयात असताना त्रास दिला त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा दाखला देऊ नये. अशांनी शिवसेनेला बाळासाहेबांचा मार्ग दाखवूच नये, असा घणाघात किशोरी पेडणेकरांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘शत्रुघ्न सिन्हांनी माझं कौमार्य विकून सोनाक्षीला अभिनेत्री बनवलं’, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ
रोगराई, राजकारण, पाऊस…, वाचा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत?
“मुख्यमंत्री बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार की बाळासाहेबांचं?”
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांचा झटका
‘तुझ्यात जीव रंगला’! अखेर अक्षया आणि हार्दिकचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो
Comments are closed.