बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप आमदार आशिष शेलारांना झटका; ‘तो’ वाद पेटण्याची शक्यता

मुंबई | वरळी येथील बीबीडी चाळीत झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजप नेते व आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात चांगलाद वाद पेटलेला पाहायला मिळत होता. पेडणेकर विरूद्ध शेलार हा वाद आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी रात्री मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) जाऊन आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पेडणेकर यांनी पोलीस ठाण्यात जात शेलारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. या तक्रारीनंतर हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

वरळी येथील बीबीडी चाळ क्र. 3 येथे सिलिंडरचा स्फोट (Worli Cylinder Blast) होऊन एकाच कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शेलार यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती.

आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर पेडणेकर विरूद्ध शेलार असा वाद पाहायला मिळत होता. मी जे बोललो ते महापौरांना उद्देशून नसल्याचं स्पष्टिकरण शेलार यांनी दिलं होतं. पेडणेकरांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर हा वाद आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांनी घेतली प्रियंका गांधींची भेट; तासभर चर्चेनंतर राऊत म्हणाले…

दिलासादायक! पहिला Omicron बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाला

“आमचं हेलिकाॅप्टर असंच ढगामध्ये सापडलं होतं…”; शरद पवारांनी सांगितला किस्सा

अपघात की घातपात? निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन म्हणतात, “चीनने हा…”

राज्याचं टेन्शन वाढलं! Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More