Top News महाराष्ट्र मुंबई

या आहेत मुंबईच्या महापौर!; पण त्या अशा वेषात रुग्णालयात का पोहोचल्या???

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आज चक्क परिचारिकेच्या वेशात मुंबईतील नायर रुग्णालयात पोहोचल्या होत्या, त्यांना अशा वेषात पाहून अनेकजण अचंबित झाले. महापौर अशा वेशात का आल्या असा प्रश्न अनेकांना पडला होता.

किशोरी पेडणेकर या माजी परिचारिका आहेत. नगरसेविका होण्याआधी त्या परिचारिकेचं काम करत होत्या. आजा कोरोनामुळे परिस्थिती बिघडलेली असताना डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका काम करत आहेत.

परिचारिकांचा तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवण्यासाठी मुंबईच्या महापौरांनी आपला जुना वेष पुन्हा परिधान केला. आज त्यांनी मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधला. नायर रुग्णालयात परिचारीकेच्या वेषात जाऊन त्यांनी तेथे काम करणाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

दरम्यान, अशा कठीण काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना खंबीर पाठिंबा देण्याची गरज असते, किशोरी पेडणेकर यांच्या या उपक्रमामुळे त्यांचं कौतुक होतंय.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे- रितेश देशमुख

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

3 मे नंतर लॉकडाऊन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या