Top News मुंबई राजकारण

सोमय्या हे शिखंडी, केवळ साडी नेसवणं बाकी; किशोरी पेडणेकरांची बोचरी टीका

मुंबई | मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याला आरोपाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “किरीट सोमय्या हे सध्या शिखंडीचा रोल करत आहेत. महाभारतात शिखंडी कौरवांच्या आडून वार करत होते. आणि फ्रॉड हा शब्द बोलायचा नाही. फ्रॉड म्हणजे सोमय्या असा समानार्थी शब्दच लोकांमध्ये प्रचलित झालाय.”

महापौर पुढे म्हणाल्या, “वारंवार तक्रारी करायच्या आणि श्वानासारखे आवाज काढून इतर लोकांना डिस्टर्ब करायची सोमय्या यांनी सवय आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, हे आम्ही नेहमीच सांगत आलोय.”

“किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत. साडी नेसायचे बाकी आहेत, ते पण आम्ही करु. किरीट सोमय्या हे शिखंडीचा रोल करत आहेत, ते त्याच लायकीचे आहेत.” अशी बोचरी टीका महापौरांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?”

‘मत खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा’; नितीश कुमारांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल

…म्हणून ट्विटरकडून काही तासांसाठी अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ब्लॉक

ठाकरे कुटुंबावरील आरोपांनंतर संजय राऊतांची किरीट सोमय्यांना वॉर्निंग, म्हणाले…

मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आलेला- मेधा कुलकर्णी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या