बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ अनाथ मुलाचं पालकत्व शिवसेना स्वीकारणार- किशोरी पेडणेकर

मुंबई | वरळी येथील सिलिंडर स्फोटाच्या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. वरळीतील बीबीडी चाळ क्र. 3 येथे एकाच कुटुंबातील 4 जण सिलिंडर स्फोटात होरपळले गेले. या कुटुंबातील 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

त्याच कुटुंबातील 5 वर्षाच्या मुलावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना (Shivsena) स्वीकारणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. 5 वर्षाचे अनाथ बाळ वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

‘बाळाची प्रकृती ठीक आहे, जर हे बाळ वाचल्यास आम्ही दत्तक घेणार. याची जबाबदारी आम्ही स्विकारणार,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार असल्याने आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे. तर आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीका करणाऱ्या विरोधकांनाही किशोरी पेडणेकरांनी टोला लगावला आहे.

संवेदना या बोंब मारून येणार नाहीत तर त्या ह्रदयातून याव्या लागतात, असा टोला किशोरी पेडणेकरांनी विरोधकांना लगावला आहे. तर ब्लास्ट झाल्यावर सेनेचेच कार्यकर्ते तिथे पोहाचले असल्याचंही किशोरी पडणेकर म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत ते तर सर्व पवारांच्या ताटाखालचे मांजर”

अभिनेता इरफान खानच्या मृत्यूविषयी नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट!

‘काही लाज उरली असेल तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’; नितेश राणे संतापले

Omicron मुळे चिंता वाढली असताना WHO ने भारताला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More