बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोण अमृता फडणवीस?, नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना पेडणकरेंनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

कोण अमृता फडणवीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी काय?, नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी अमृता फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, आमच्या लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतंही काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी, अशी बोचरी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा”

“मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला तर त्याचं श्रेय देखील घ्या पण…”

“केंद्राचा निकाल चंद्रकांत पाटील आणि राणेंसारख्या नेत्यांना मान्य आहे का?”

‘या’ तारखेला कॉलेजेस सुरु होण्याची शक्यता; उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

“उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More