मुंबई | मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईकरांनी काळजी घेतली नाही तर त्यांना पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागू शकतो, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
कोरोना परिस्थितीबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच ट्रेनमध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक मास्क घालत नाहीत. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा आपण दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशने जाऊ. लॉकडाऊन पुन्हा लागू करावा का नाही हे लोकांच्या हाती आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
आपल्याकडे अमेरिकेपेक्षाही जास्त लसीकरण झालं आहे. त्या ही लस घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच सर्वांनी लस घेतली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवरउद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील ‘या’ भागात विद्यार्थ्यांसाठी सरकार 9 मजली भव्य वसतीगृह उभारणार!
‘लिहून घ्या, …त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस’; भाजपच्या या आमदाराने सांगितली वेळ!
…म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा अटक
मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई
रिहानाचा ‘हा’ टाॅपलेस फोटो पाहून राम कदम संतापले, म्हणाले…