Top News महाराष्ट्र मुंबई

कोरोनाच्या गंभीर रुग्णांनाच बेड मिळावा- किशोरी पेडणेकर

मुंबई | मुंबईमधली कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. गंभीर आणि तातडीने उपचारांची गरज असलेल्यांनाच हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर लगेचच बेड मिळावा असं त्यांना वाटतं, पण असं होऊ शकत नाही. हॉस्पिटल्सवरही खूप तणाव आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटलमधल्या बेडच्या प्रश्नावरुन सरकारवर टीका केली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजना फक्त नोंदणीकृत रुग्णालयात केली जात आहे. काही मोठ्या रुग्णालयात बेड्स नाहीत, असं दाखवलं जात आहे. पण मागच्या दरवाजाने प्रवेश दिला जातोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स कागदावरच घेतले आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

‘निसर्ग’ आपत्तीत ठाकरे सरकार जनतेच्या पाठीशी- अजित पवार

पुण्यालगत असणाऱ्या ‘या’ 4 गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द

राज्यात आज तब्बल 2234 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा तुमच्या भागात किती नव्या रूग्णांची नोंद…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या