महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले”

मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात फक्त 50 जणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. यावर उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणासाठी कान आतूरलेले आहेत, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे .

बरेच दसरे असे आहेत की जे लक्षात राहण्यासारखे आहे. त्यातलाच हा एक आहे. की एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू म्हणजेच आनंद आहे. कोरोनामध्ये आमचे जवळचे नगरसेवक, आमदार, शिवसैनिकांचं निधन झालं. त्यामुळे आसू आहेत, असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं

आज पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहे. ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख या दोन भूमिकांमध्ये असणार आहेत. त्यामुळे आमचे कान आतूरलेले आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

दरम्यान, जब तक चांद सूरज है तब तक बाळासाहेब है और तब तक शिवसैनिक है, असंही किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस…- अमृता फडणवीस

“आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचं आहे”

…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजयपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे

‘या’ अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सामील झालो- एकनाथ खडसे

पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी- पंकजा मुंडे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या