बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुंभमेळ्याहून परतणारे भाविक प्रसाद म्हणून कोरोना घेऊन येतील”

मुंबई | कुंभमेळ्याहून परतणारे भाविक प्रसाद म्हणून कोरोना घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे. मात्र जे भाविक मुंबईत परततील त्यांना क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.

हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पेडणेकरांनी दिलीये. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवलं जाणार आहे. भावना-भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जिवंत राहिलात तरच. काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे. तसेच मुंबईकरांनो तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत. मुंबईतील बेडची संख्या 19 हजारावरुन 25 हजार केले आहेत. तर 6 मोठे जम्बो सेंटर उभारले आहेत. मुंबईत जर परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं पेडणेकरांनी म्हटलं आहे. 

हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

15 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; पुुण्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू

महाराष्ट्राकडून मी तुम्हाला विनंती करतो, राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा- जितेंद्र आव्हाड

…म्हणून मुलीनंच घरच्यांच्या जेवणात मिसळलं विष; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

आज मुंबई-हैदराबाद आमने-सामने; सलग पराभवाचा सामना करणाऱ्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More