बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील लॉकडाऊनसंदर्भात किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. 50 टक्के क्षमतेने हॉटेल उघडी राहणार असून यावरती लक्ष राहणार आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणालेत. त्या मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आपण आजही डेन्जर झोनमध्ये आहोत. पहिल्यांदा झोपडपट्टी भागातून कोरोना वाढत होता, आता उच्चभ्रू वस्तीतून कोरोना वाढत खाली येतोय. गर्दीत मास्क घालणं आवश्यक आहे. मास्क तोंडाच्या खाली ठेवत असल्यानेच बाधित रुग्णांची संख्या वाढतेय, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

धार्मिक स्थळ पूर्णतः बंद होतील. कारण लोक ऐकतच नाहीये. वयोवृद्ध आणि लहान मुलं जास्त करून धार्मिक स्थळी जात असल्याचा ट्रेंड दिसतोय. लोकलनंही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करू शकतील. मॉल, थिएटर आता बंद होतील, असे संकेत पेडणेकर यांनी दिले आहेत. तसेच राज्य सरकारकडून लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाईल. खासगी ऑफिसमध्ये 50 टक्के उपस्थिती असेल, वर्क फॉर्म होम करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल, असंही त्या म्हणाल्यात.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. गुरुवारी 43183 नवीन रुग्णांची नोंद झाली. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,56,163 वर पोहोचला आहे.

थोडक्यात बातम्या- 

14 वर्षांचं प्रेम मात्र फक्त एक नकार आणि झाला रक्तरंजीत शेवट!

राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे धक्क्यावर धक्के, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!

नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More