बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येतं, पण…”

मुंबई | राज्यात सध्या कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे लवकरच निर्बंध वाढविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Bjp Leader Kirit Somayya) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भीती सर्वसामान्यांना दाखवली जात असल्याचा आरोप केला होता. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pedanekar) यांनी यावरून सोमय्यांवर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.

‘घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे,’ असा घणाघात पेडणेकर यांनी केला आहे.

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी कोविड सेंटरची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी नागरिकांना मुंबईत चौपट वेगाने रुग्णवाढ होत असून घाबरण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ‘काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढविण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत,’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना खडसावलं आहे.

थोडक्यात बातम्या-

संधी सोडू नका! iPhone 12 Mini वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

“धनंजय मुंडे यांचाही आमच्या पक्षाला पाठिंबा”, करूणा मुंडेंचा दावा

प्रतिक्षा संपली! सुपरडुपर हिट पुष्पा सिनेमा आजपासून टीव्हीवर पाहता येणार!

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणावरून जावेद हबीब यांनी मागितली माफी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More