बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आक्षेपार्ह भाषेतील त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या….

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील 1 कोटी लसीकरणाच्या संदर्भातील होती. ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला 9 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की, कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिलं आहे. यावर संतापलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला मराठीत ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट नंतर डिलीट केलं असलं तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर त्या आक्षेपार्ह ट्विटवर किशोरी पेडणेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केलं. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

थोडक्यात बातम्या- 

घोड्यावर उभं राहून करत होता स्टंट अन्…, पाहा व्हिडीओ

लैंगिक शक्ती कशी वाढवाल?; ‘या’ अभिनेत्यानं यूट्यूबवर शेअर केला व्हिडीओ

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी, संभाजीराजेंना मोठा धक्का!

भर मंडपात नवरीने केलं असं काही की…; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

हॅाटेलच्या रुममधून येत होता पत्नीचा आवाज, मात्र पतीनं पकडताच केला धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More