“मनसे आता उद्धव ठाकरेंचे वडीलही हायजॅक करणार का?”
मुंबई | पाडवा मेळाव्यापासून राज्यात मनसेनं आपल्या आक्रमक राजकारणाला सुरूवात केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवाजी पार्क आणि ठाण्यातील सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे.
बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना मनसेनं शिवसेना भवनावर दगडफेक केली होती, त्यांना यातना दिल्या होत्या. आता हीच मनसे बाळासाहेबांच्या नावानं राजकारण करत आहे. मनसे बाकी सर्वकाही आतापर्यंत हायजॅक करत आली आहे, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत.
बाकी गोष्टींसारखं आता तुम्ही उद्धव ठाकरेंचे वडीलही हायजॅक करणार का?, असा सवाल पेडणेकरांनी मनसेला केला आहे. शिवसेना भवनाला टार्गेट केल्याशिवाय व शिवसेनेवर कुरघोडी केल्याशिवाय मनसेला टीआरपी मिळत नाही, असा टोलाही पेडणेकरांनी लगावला आहे.
दरम्यान, आम्ही भूमिका बदलल्या असतीलही पण त्यातून आम्ही स्वार्थासाठी काही केलं नाही, असं म्हणत पेडणेकरांनी मनसेला घेरण्याचं काम केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
… अन् ‘या’ कारणामुळे रणबीर-आलियाने लग्नात सात नाही तर चारच फेरे घेतले
“गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा”
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा
संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना थेट इशारा, म्हणाले…
“असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार?”
Comments are closed.