Kishwer Merchant | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चंट गेल्या काही दिवसांपासून मालिकांमधून लांब गेली आहे. मात्र, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी सतत नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. किश्वर आपल्या प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर किश्वरची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. दरम्यान, वयाच्या 40 व्या वर्षी किश्वरने बाळाला जन्न दिला आहे.
40 व्या वर्षी आई?
व्याच्या 40 वया वर्षी किश्वर (Kishwer Merchant) आई झाली असल्याचं तिने स्वतः म्हटलं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी गरोदर राहिल्यावर कोण कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याबदल तिने सांगितलं आहे. एका शोमध्ये बोलत असताना किश्वर म्हणाली की, “मला माहित आहे की, वयाच्या 40 व्या वर्षी अचानक प्रेग्नेंट होणं प्रत्येकासाठी सोपं नसतं. पण जेव्हा मी गरोदर राहिली तेव्हा ते अचानकपणे झालं.”
मला माहित नव्हतं-
पुढे ती (Kishwer Merchant) म्हणाली की, “दोन महिने मला थोडं अशक्त वाटू लागलं आणि मग मी खूप खाऊ लागले. मला हे देखील माहित नव्हतं की, मी प्रेग्नंट आहे आणि मला काही समजत नव्हतं. मग एक दिवस मी सुयशला सांगितलं की, तू प्रेग्नेंसी स्ट्रिप्स घेऊन ये आणि त्याने ते आणलं मग त्याचा रिझल्ड पॉझिटिव्ह आला.” तेव्हा मला समजलं.
View this post on Instagram
मला धक्का बसला-
पुढे ती म्हणाली की, जेव्हा मी प्रेग्नेंसी चेक केली तेव्हा तो पॉझिटिव्ह आला. त्यावेळेस मला स्वतःला देखील धक्का बसला. मला कळलंच नाही. सुयशला हे कसं सांगावं हे मला समजत नव्हतं. पण नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि मला कळलं की, मी 2 महिन्यांची गर्भवती आहे.
News Title : Kishwer Merchant became mother at 40 age
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; ठाकरे गटाला दिला मोठा धक्का
ठाकरेंच्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार? संभाव्य उमेदवारांची यादी
‘….म्हणून मी या अभिनेत्रीला सुरक्षा देतो’; सलमानच्या बाॅडीगार्डचा मोठा खुलासा
गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार? म्हणाली मी आता…
‘एकाच महिलेला किती…’; राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद