आमदाराने आयोजित केली चुंबन स्पर्धा, बघ्यांची उसळली गर्दी

रांची | आमदारांनी खेळाच्या किंवा नृत्य स्पर्धा आयोजित केल्याचं आपण ऐकलं असेल मात्र झारखंडच्या पाकुल जिल्ह्यातील तालपहाडी गावात एका आमदाराने चक्क चुंबन स्पर्धा आयोजित केली होती. 

सायमन मरांडी असं या आमदाराचं नाव असून ते झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आहेत. ते दरवर्षी यात्रेचं आयोजन करत असतात मात्र यंदा भरवलेल्या यात्रेत चुंबन स्पर्धा ठेवल्यानं एकच गर्दी उसळली होती. 

सर्वात जास्त वेळ चुंबन करणाऱ्या जोडप्याला सायमन मरांडी यांनी स्वतः सन्मानित केलं. आदिवासींमध्ये प्रेमाची भावना वाढावी, यासाठी या स्पर्धेचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हिंदू जनजागरण मंच आणि भाजपने या स्पर्धेला जोरदार विरोध केला.