कोलकात्याकडून दिल्लीचा दारुण पराभव, गुणतालिकेत अव्वल

कोलकाता | कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यानं दिल्लीचा पराभव केला. या विजयासह गुणतालिकेत कोलकाता पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. 

ईडन गार्डनवरील या सामन्यात संजू सॅमसनच्या 60 आणि श्रेयस अय्यरच्या 47 धावांच्या जोरावर दिल्लीनं 20 षटकात 160 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार गंभीरनं 52 चेंडूत 71 धावांची तर उथप्पाने 33 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्यामुळे 7 गडी आणि 22 चेंडू राखून कोलकात्यानं दिल्लीवर विजय मिळवला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा