बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ‘या’ कारणामुळे सलामीवीर KL Rahul संघाबाहेर

मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला ओळखण्यात येतं. आयपीएलच्या 2022 वर्षाच्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया (IPL Auction 2022) 12-13 तारखेला पार पडणार आहे. अशात सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज विरोधात मालिका खेळत आहे. वनडे मालिकेचा शेवट होत आहे तर टी-ट्वेंटी मालिकेला 13 तारखेपासून सुरूवात होणार आहे.

टी-ट्वेंटी मालिकेच्या सुरूवातीला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज आणि संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळं संघाबाहेर गेला आहे. राहुलसह भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा देखील कोरोना प्रादुर्भावामुळे संघाचा हिस्सा असणार नाही. परिणामी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

केएल राहुल, अक्षर पटेल यांच्या जागी युवा फलंदाज ऋतूराज गायकवाड आणि दिपक हुड्डा यांची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल हा टी-ट्वेंटी प्रकारातील स्पेशालिस्ट खेळाडू मानला जातो. अशात त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ रोहित शर्माच्या साथीनं सलामीवीर म्हणून कोणत्या खेळाडूला पाठवणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आयपीएलच्या सुरूवातीला काही अवधी शिल्लक असताना केएल राहुल जखमी झाल्यानं लखनऊ संघाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“संजय राऊत तुम्ही फक्त फडणवीसांच्या घराबाहेर याच, मग आम्ही बघू”

“शरद पवार साहेबांना माझा शब्द…”; जयंत पाटलांनी दिल्या ‘प्राॅमिस डे’च्या हटके शुभेच्छा

मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने कारावासाची शिक्षा

‘केम छो वरळी?’नंतर आता शिवसेनेचं ‘गोंयकारांनो कशे आसात?’

“ठाकरे-पवार एकत्र आल्यानं भाजपच्या पोटात दुखतंय, मविआचे स्टेअरिंग…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More