KL Rahul ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; रक्कम ऐकून थक्क व्हाल!
नवी दिल्ली | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून भारतीय क्रिकेट मंडळाची ओळख आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड दरवर्षी जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलचं आयोजन करत असतं. आयपीएलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देशातील क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळडूंसह खेळण्याचा अनूभव येत आहे.
यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये नव्यानं दोन संघांचा समावेश झाला आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघानी आपापाल्या तीन खेळाडूंची यादी बीसीसीआयला पाठवली आहे. भारताचा स्फोटक सलामीवीर आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार केएल राहुलला लखनऊ संघानं तब्बल 17 कोटी रूपये किंमत देऊन करारबद्ध केलं आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन स्विकारणारा विराटसह केएल हा दुसरा खेळाडू बनला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराटला आरसीबी संघानं 2018 साली 17 कोटी रूपयांनाच करारबद्ध केलं होतं. परिणामी आता विराट कोहली आणि केएल राहुल हे सर्वाधिक रक्कम घेणारे दोन खेळाडू ठरले आहेत. लखनऊ संघानं केएल राहुलसह ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टाॅइनिसला 9.2 कोटी तर युवा फिरकीपटू रवि बिश्नोईला 4 कोटी रूपये देऊन करारबद्ध केलं आहे.
दरम्यान, आयपीएलचा 2022 चा हंगाम आता जवळ आला आहे. फेब्रुवारीमध्ये मेगा ऑक्शन देखील होणार आहे. परिणामी प्रत्येक संघ आपल्या संघामध्ये संतुलन ठेवणारे खेळाडू घेण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
“…म्हणून भाजपला दु:ख होतंय”, जयंत पाटलांचा खोचक टोला
“नाना पटोले मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत, त्यांच्यामुळं सोनिया गांधी…”
“कोल्हे देशाची माफी मागा, अन्यथा…” तीन तरुणांनी जाहीर केली भूमिका
Gold Price: सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर
‘…तोपर्यंत शाळा सुरु करण्यास मोठा धोका’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Comments are closed.