खेळ

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा फलंदाज के एल राहुल कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

नेट प्रॅक्टिसदरम्यान राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे तो पुढील दोन्ही कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.

राहुलला झालेल्या दुखापतीमुळे त्याला 3 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो सिडनीवरुन भारतात परतणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून दुखापतीमुळे मायदेशी परतणारा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादवही दुखापतीमुळे भारतात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक!

राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचा खुलासा म्हणाले…

‘…तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही; शेतकरी आक्रमक

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल!

शेतकरी मागणीवर ठाम; थंडी-पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या