बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

के. एल राहुलचं दमदार शतक; तब्बल 31 वर्षांनी केला ‘हा’ विक्रम

लंडन | सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यानंतर आता दुसरा सामना खिशात घालण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ ऐतिहासिक अशा लार्डस मैदानावर उतरले आहेत. या दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. भारतीय संघाच्या सलामवीरांनी संयमी खेळी करत पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या उभा केली. सलामवीर के एल राहुलने दमदार शतक ठोकत तब्बल 31 वर्षांचा रेकाॅर्ड मोडला.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भारतीय सलामवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानात आले. दोघांनी भारताला सावध सुरूवात करून दिली. तर दुसरीकडे इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अॅडरसन आणि ओली राॅबिन्सन यांनी भेदक गोलंदाजी केली. पंरतु राहुल आणि रोहित दोघांनी त्यांचे चेंडू खेळून काढले. इंग्लंडचा तीसरा गोलंदाज सॅम करन याला दोघांनी लक्ष करत धावसंख्या वाढवली.

रोहित शर्माने 83 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा 83 धावांवर खेळत असताना जेम्स अॅडरसनच्या एका आतमध्ये येणाऱ्या चेंडूने रोहितचा त्रिफळा उडवला. रोहित शर्मा 83 धावा करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला जास्त काही करता आलं नाही. तो केवळ 9 धावा करत तंबुत परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने राहुलला साथ दिली. त्यानं 42 धावा केल्या. त्यातच वेळी भारताची एक बाजू संभाळून खेळत असलेल्या के एल राहुलने शतक केलं.

के एल राहुलने त्याच्या करियरमधील 6 वं शतक झळकावलं. तर ऐतिहासिक अशा लार्डस मैदानावर त्याचं हे पहिलं शतक होतं. लार्डसवर सलामवीर म्हणून शतक ठोकणारा तो रवी शास्त्रीनंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यानं 31 वर्षानंतर हा विक्रम केला आहे. त्याआधी 1990 साली रवी शास्त्री यांनी लार्डसवर शतक केलं होतं. राहुलने 212 चेंडूत शतक पुर्ण केलं. सध्या राहुल आणि अजिंक्य रहाणे मैदानात खेळत आहेत. भारताने पहिल्या दिवशी 276 धावांवर 3 गडी गमावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

नाशिकच्या लाचखोर फरार महिला शिक्षणाधिकारी यांची संपत्ती पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

दिलासादायक! खाजगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, ठाकरे सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला घामटा, अँडरसनच्या अफलातून चेंडूने शतकापासून ठेवलं दूर; पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! संजय राठोडांनी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोस्टाने पोलिसात तक्रार

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More