पाटणा | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे.
मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन, असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. तसेच पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत, असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल… तर मी बोलेन की खबरदार… जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन, असं कन्हैया कुमार यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
युपी पुन्हा हादरलं, झोपेत 3 बहिणींवर अॅसिड हल्ला
‘या’ कारणामुळे ख्रिस गेलला केलं रूग्णालयात दाखल!
हाथरस प्रकरणी मोठा निर्णय; तपास करण्याचा अधिकार…