तंत्रज्ञान

जिओचं बेस्ट प्रीपेड प्लॅन लाँच; रोज मिळणार 3 जीबी डेटा!

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्स जिओने ने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनेक बदल केलेत. या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या टॅरिफ दरवाढीमुळे आता जिओचे प्रीपेड प्लॅन 40% महागलेत. प्लॅन महाग झाले असले तरीही युजर्सना आधीपेक्षा 300% ज्यादा फायदा मिळतोय असं कंपनीचं म्हणणं आहे.

रिलायन्स जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5जीबी डेटा, जिओ ते जिओ नेटवर्कसाठी मोफत कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे, दररोज 100 एसएमएस मोफत आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

रिलायन्स जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जिओच्या नेटवर्कवर मोफत कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 FUP मिनिट मिळतात. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

दरम्यान, रिलायंस जिओच्या 2,020 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5जीबी डेटा मिळतो. यामध्ये जिओ ते जिओ कॉलिंग मोफत असून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिट मिळतात.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या