बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

10 वर्षांच्या प्रवासात पटकावला ट्विटरच्या CEOपदाचा मान! पराग अग्रवाल नेमके आहेत तरी कोण ?

नवी दिल्ली | काही दिवसांपासून ट्विटर (Twitter) कंपनीत मोठा बदल होणार असल्याची चर्चा रंगली होती. ही चर्चा खरी ठरत ट्विटरचे सह-संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsi) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांची वर्णी लागली. सीईओ पदाचा मान पटकावणारे पराग अग्रवाल आहेत तरी कोण ते पाहुयात.

ट्विटरच्या सीईओ पदाचा मान पटकावणारे पराग अग्रवाल यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण आयआयटी मुंबई येथुन पुर्ण केलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड या कॉलेजमधून सायन्समध्ये पीएचडी केली व त्यानंतर इंजिनिअर म्हणुन त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात केली. (New CEO Of Twitter Parag Agarwal)

पराग अग्रवाल यांनी मायक्रोसॉफ्ट, याहू, एटी अॅड टी यासारख्या नामवंत कंपनीत काम केलं आहे. पराग यांनी 2011 साली ट्विटर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन कामाला सुरूवात केली. 2017 साली पराग यांची बढती झाली व त्यांच्याकडे चिफ टेक्नॉलॉची ऑफिसर हे पद देण्यात आलं.

सीटीओ म्हणुन पदभार सांभाळत असताना ट्विटरमधील दहा वर्षांच्या प्रवासात पराग यांनी सीईओ होण्याचा मान पटकावला आहे. ट्विटरचे मावळते सीईओ जॅक डोर्सी यांनीच 2011 साली परागची निवड केली होती. त्यानंतर बरोबर 10 वर्षांनी त्यांनीच परागकडे सीईओ पदाची जबाबदारी सोपवली आहे. पराग यांची नोंद सीलीकॉन व्हॅलीमधील भारतीय वंशांच्या सीईओच्या यादीतही झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली, प्रवासासह इतरही गोष्टींवर आली बंधनं

पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ होताच कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली…

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

“शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा”, मनसेची मागणी

“कोलांटीउड्याच्या स्पर्धेत माकडही मागं पडतील, अधिवेशन आलं की यांची तब्येत बिघडते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More